रोहित शर्माने पहिला षटकार ठोकत नोंदवला विक्रम, बाबर आझमला टाकलं मागे

रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने अर्धशतकी खेळीसह काही विक्रम आपल्या नावावर केला आहे. चला जाणून घेऊयात कोणते विक्रम नोंदवले ते...

| Updated on: Mar 09, 2025 | 7:44 PM
1 / 5
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत अर्धशतक ठोकलं. 41 चेंडूत 50 धावा केल्या. यासह टीम इंडियाचं विजय गणित सोपं केलं. यासह रोहित शर्माने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

2 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माने षटकार ठोकला. कायल जेमिसनला षटकार मारला. रोहित शर्माने या खेळीसह वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.  तसेच बाबर आझमचा विक्रम मोडला आहे.

3 / 5
पाकिस्तानच्या बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्ध 23 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1009 धावा केल्या होत्या, पण रोहितने आता त्याला मागे टाकले आहे. रोहितनेही चौकार मारून षटकार आणि चौकार मारून हा विक्रम आपल्या नावे केला.

4 / 5
रोहित शर्मा सौरव गांगुली आणि एमएस धोनीच्या क्लबमध्ये सामील झाला. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50हून अधिक धावा करणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय कर्णधार ठरला.दुसरीकडे, रोहित शर्माने सलग 12 नाणफेकीचे कौल गमावले आहेत. ब्रायन लारासह पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर भारताने सलग नाणेफेक गमवण्याची ही 15वी वेळ आहे. भारतीय या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

5 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा वनडे फॉर्मेट खेळणार की नाही याबाबत चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने आक्रमक खेळी अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचं दाखवून दिलं आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय ट्वीटर)