
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेतील शेवटचा सामन्यात रोहित शर्माकडे विक्रम रचण्याची संधी आहे. हा सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. (Photo- BCCI Twitter)

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात फेल गेला होता. पण दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने कमबॅक केलं आणि 73 धावांची खेळी केली. तशाच कामगिरीची अपेक्षा आता सिडनी वनडे सामन्यात आहे. (Photo- BCCI Twitter)

रोहित शर्माकडे सिडनी वनडे सामन्यात पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. रोहित शर्मा वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या शाहिद आफ्रिदीच्या रेकॉर्डपासून फक्त काही पावलं दूर आहे. (Photo- BCCI Twitter)

रोहित शर्माच्या नावावर 267 डावांमध्ये 346 षटकार आहेत. तर शाहिद आफ्रिदीच्या नावावर 369 डावात 351 षटकार आहेत. म्हणजेच चार षटकार मारताच रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम होऊ शकतो. (Photo- BCCI Twitter)

दरम्यान, रोहित शर्माने सिडनी वनडे सामन्यात एक षटकार मारताच या मैदानात सर्वाधिक षटकार मारणारा आशियाई खेळाडू ठरेल. रोहितने सिडनीत 9 षटकार मारले आहेत. तर जयसूर्याच्या नावावरही इतकेच षटकार आहेत. (Photo- BCCI Twitter)