चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्मा ईज बॅक! तीन षटकार ठोकत ख्रिस गेलला टाकलं मागे

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना कटक मैदानावर सुरु आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला काही अंशी दिलासा मिळाला आहे. इंग्लंडने दिलेल्या 305 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. यावेळी त्याने षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Feb 09, 2025 | 6:49 PM
1 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा जुन्या शैलीत परतेल का? याची चिंता क्रीडाप्रेमींना लागून आहे. असं असताना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. यावेळी षटकारांचा एक विक्रम आपल्या नावावर केला.

2 / 6
रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. रोहित शर्माने एक षटकार मारताच दुसऱ्या स्थानावर झेप मारली आहे.

3 / 6
रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये  एकूण 334 षटकार झाले आहेत. या षटकारांच्या यादीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने 18 चेंडूत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 1 चौकार मारला.

4 / 6
वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आघाडीवर आहे. त्याने 398 वनडे सामन्यात 351 षटकार मारले आहेत. रोहित शर्माच्या नावावर आता 334 षटकार असून दुसऱ्या स्थानावर आहे.

5 / 6
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये ख्रिस गेलच्या नावावर 331 षटकार आहेत. आता रोहित शर्माने त्याला मागे टाकत दुसरं पटकावलं आहे.

6 / 6
सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता सक्रिय खेळाडू म्हणून रोहित शर्मा एकमेव आहे. चौथ्या स्थानी 270 षटकारांसह सनथ जयसूर्या, पाचव्या स्थानी 229 षटकारांसह एमएस धोनी आणि 220 षटकारांसह इयॉन मॉर्गन सहाव्या स्थानी आहे.