
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात धर्मशालेत 7 मार्चपासून पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे.

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची सूत्रं आहेत.

रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. रोहित या महारेकॉर्डपासून फक्त 1 सिक्स दूर आहे.

हिटमॅन रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सिक्सचं अर्धशतकासाठी 1 सिक्सची गरज आहे. रोहितच्या नावावर आतापर्यंत डब्ल्यूटीसीमध्ये 49 सिक्सची नोंद आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा 2019 पासून खेळवण्यात येत आहे. तेव्हापासून या स्पर्धेत सर्वाधिक 78 सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नावावर आहे.

तर रोहित शर्माने डब्ल्यूटीसीमध्ये 31 सामन्यांमधील 53 डावांमध्ये 49 सिक्स ठोकले आहेत. आता रोहितने 1 सिक्स लगावल्यास डब्ल्यूटीसीमध्ये सिक्सचं अर्धशतक करणारा पहिला भारतीय आणि बेन स्टोक्सनंतर दुसरा फलंदाज ठरेल.