IND vs SA Test: यशस्वी जयस्वालच्या रडारवर रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, इतकं केलं की रेकॉर्ड नावावर

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यात काही विक्रम रचले आणि काही मोडले जाणार हे नक्की आहे. असं असताना यशस्वी जयस्वालच्या रडारवर रोहित शर्माचा मोठा विक्रम आहे.

| Updated on: Nov 12, 2025 | 7:44 PM
1 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डनर मैदानावर होणार आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वालकडे रोहित शर्माचा विक्रम मोडण्याची संधी आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत 26 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यातील 49 डावांमध्ये 51.65 च्या सरासरीने 2428 धावा केल्या आहेत. यामध्ये 7  शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.  यात त्याने 43 षटकार आणि 301 चौकार मारले आहेत. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
यशस्वी जयस्वालने कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात 7 षटकार मारले तर रोहित शर्माचा आपल्या नावावर करेल. कसोटीत सर्वात जलद 50  षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनेल. रोहित शर्माच्या नावावर 51 कसोटी डावात 50 षटकार मारण्याचा विक्रम आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
रोहित शर्माचा विक्रम मोडणे जयस्वालसाठी सोपे नसेल.  कारण त्याला काय ते पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात करावं लागेल. तसं केलं तर 50 डावात त्याच्यापेक्षा जास्त षटकार होतील. दुसऱ्या डावात झाले तर त्या विक्रमाची बरोबरी होईल. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वाल 2500 कसोटी धावाही पूर्ण करू शकतो. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त 72 धावा हव्यात. 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता पुढील दोन सामन्यांमध्ये मोठी खेळी अपेक्षित असून पुढे जाऊ शकतो. (Photo- BCCI Twitter)