IPL 2026: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा नकोसा विक्रम, शतकांच्या बाबतीत असं घडलं

आयपीएल 2026 स्पर्धेतील 34वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने 205 धावांची खेळी केली. पण आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद झाली. काय ते जाणून घ्या

| Updated on: Apr 24, 2026 | 9:59 PM
1 / 5
गुजरात टायटन्सचा युवा ओपनर साई सुदर्शनचं चक्र आरसीबीविरुद्ध चाललं. त्याने संयमी फलंदाजी करत आरसीबीविरुद्ध शतक ठोकलं. त्याच्या या खेळीमुळे आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला. नेमकं काय घडलं ते पुढे जाणून घेऊयात. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
साई सुदर्शनने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 58 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यासह आरसीबी आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतकं देणारा संघ ठरला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
साई सुदर्शनच्या शतकी खेळीनंतर आरसीबीविरुद्ध शतकांची संख्या 15 वर पोहोचली आहे. आरसीबीने या यादीत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स मागे टाकलं आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सने संयुक्तपणे 14-14 शतकं दिली आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादने प्रत्येकी 11 शतकं दिली आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
साई सुदर्शनने आयपीएल स्पर्धेतील तिसरं शतक ठोकलं आहे. आयपीएल 2024 पासून त्याने प्रत्येक पर्वात शतकाची नोंद केली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत कमी डावात 2000 धावा करण्याचा विक्रम रचला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Follow Us