आरसीबीला आपला इतिहास बदलणार का? आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच असं करण्याची संधी

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून टॉप 2 मध्ये राहिल अशी स्थिती आहे. त्यामुळे क्वॉलिफायर 1 मध्ये खेळणार हे देखील जवळपास निश्चित आहे. असं असताना एक मोठा कारनामा करण्याची संधी आहे.

| Updated on: May 22, 2026 | 6:24 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपला शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. असं असताना आरसीबी साखळी फेरीचा शेवटचा सामना जिंकून अव्वल स्थान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा सामना खास असणार आहे. कारण या सामन्यात विजयासह एक मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी आरसीबीला करता आलेली नाही. यासाठी सनरायझर्स हैदराबादला पराभूत करावं लागणार आहे.  (Photo: IPL/BCCI)

3 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला पराभूत  केलं तर या पर्वात दहावा विजय असेल. यापूर्वी आरसीबीने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका पर्वात दहा सामने जिंकलेले नाहीत.  मागच्या पर्वातही 9 सामने जिंकले होते. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे पदरात 19 गुण पडले होते. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. त्यामुळे टॉप 2 मधील स्थान पक्कं करण्याचा हेतू असेल. कारण अंतिम फेरी गाठण्यासाठी संघाला दोन संधी मिळतात.  (Photo: IPL/BCCI)

5 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील दुसरा सामना आहे. मागच्या सामन्यात आरसीबीने हैदराबादला 6 विकेट राखून पराभूत केलं होतं. आता हे संघ या पर्वात दुसऱ्यांदा भिडणार आहेत.  (Photo: IPL/BCCI)

Follow Us