
क्रिकेटमध्ये नियमांनुसार एका ओव्हरमध्ये 6 बॉल टाकले जातात. मात्र भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यात गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये चक्क 11 बॉल टाकले. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज पॅट्रिक क्रूगर याने एका ओव्हरमध्ये 11 बॉल टाकले.

पॅट्रिकने टीम इंडियाच्या डावातील नवव्या ओव्हरमध्ये तब्बल 11 बॉल टाकले. पॅट्रिकने या षटकात 15 धावा देत 1 विकेट घेतली.

पॅट्रिकने या ओव्हरमध्ये 2 नो बॉल, 3 वाईट टाकले. तर टीम इंडियाकडून पॅट्रिकला या ओव्हरमध्ये चौकार लगावण्यात आला. तसेच पॅट्रिकने 1 पण मोठी विकेट घेतली.

पॅट्रिकच्या या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने 1 धाव घेतली. संजू सॅमसन याने दुसर्या चेंडूवर चौकार लगावला. संजूने तिसऱ्या बॉलवर 1 रन घेतली.

पॅट्रिकने त्यानंतर नो बॉल टाकला. त्यामुळे फ्री हीटवर 2 धावा मिळाल्या. मात्र पॅट्रिकने चौथा बॉल टाकण्याआधी 1 नो बॉल आणि 3 वाईट टाकले. थोडक्यात पॅट्रिकने 5 प्रयत्नानंतर चौथा बॉल अचूक टाकण्यात यशस्वी ठरला.

संजू सॅमसन याने पाचव्या चेंडूवर 1 धाव घेतली. मात्र शेवटच्या अर्थात सहाव्या बॉलवर घात झाला. पॅट्रिकने सूर्यकुमार यादव याला 21 धावांवर आऊट केलं.