
टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक टी 20 धावांचा विक्रम हा गौतम गंभीर याच्या नावावर आहे. गौतम गंभीर याने 8 टी 20 सामन्यांमध्ये 46 च्या सरासरीने 276 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याबाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. धोनीने 13 टी 20 सामन्यांमध्ये 30.50 च्या सरासरीने 244 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा 173 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 9 सामन्यांमध्ये 43.25 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.

वीरेंद्र सेहवाग यने 27.83 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत. सेहवागने या धावा 7 टी 20 सामन्यांमध्ये केल्या आहेत.

टीम इंडियाचा स्टार माजी ऑलराउंडर युवराजन सिंह याने 26.66 च्या एव्हरेजने 160 धावा केल्या आहेत. युवराजने 7 टी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.