श्रेयस अय्यरची तब्येत कशी आहे? एका फोटोसह नवीन माहिती त्याने स्वत:च केली शेअर

श्रेयस अय्यरसाठी ऑस्ट्रेलिया दौरा काही खास गेला नाही. टीम इंडियात कमबॅक झालं खरं पण पुन्हा एकदा दुखापतीने ग्रासलं. तिसऱ्या वनडे सामन्यात झेल पकडताना गंभीर दुखापत झाली आणि थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. आता अय्यर लवकरच भारतात परतणार आहे.

| Updated on: Nov 11, 2025 | 5:34 PM
1 / 5
भारताचा वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. पण त्याची तब्येतीची काळजी चाहत्यांना लागून आहे. 25 ऑक्टोबरला तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. त्यातून सावरण्यासाठी त्याला एका महिन्याचा अवधी लागणार आहे. (फोटो- Ayush Kumar/Getty Images)

2 / 5
सिडनीत झालेल्या वनडे सामन्यात हार्षित राणाच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरीचा झेल पकडताना त्याला दुखापत झाली होती. बॅकवर्ड पॉइंटवर असताना उंच उडालेला चेंडू पकडण्यासाठी त्याने मागे धाव घेतली. तसेच उडी मारत झेल पकडला. पण असं करताना त्याला गंभीर दुखापत झाली. (फोटो- Getty Images)

3 / 5
दुखापतीमुळे श्रेयस अय्यर मैदानातच कळवळला होता. त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे हे सुरूवातीला कळलं नाही. त्यामुळे तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा प्लीहामध्ये रक्तस्त्राव होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याला आयसीयूत दाखल केलं होतं. (फोटो- Getty Images)

4 / 5
श्रेयस अय्यर आता बरा आहे आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली सिडनीमध्येच आहे. यावेळी त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. तसेच प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.  (फोटो- Mark Evans - CA/Cricket Australia via Getty Images)

5 / 5
श्रेयस अय्यरने सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर बसलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत लिहिलं की, "मला सूर्याकडून उत्तम थेरपी मिळाली. परत आल्याबद्दल आभारी आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद," असे त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले. (Photo- Instagram)