
शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पदार्पणातील मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंड विरुद्ध अपेक्षेपेक्षा धमाकेदार कामगिरी केली. शुबमनने लीड्समध्ये पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी शानदार शतक झळकावलं. शुबमनने यासह काही विक्रम केले आहेत. (Photo Credit: PTI)

शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे सहावं शतक ठरलं. तसेच शुबमनची आशियाबाहेर शतक करण्याची पहिलीच वेळ ठरली. शुबमनचं विदेशातील हे दुसर शतकं ठरलं. (Photo Credit : Getty Images)

शुबमन कसोटीत कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात शतक करणारा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला. शुबमनने वयाच्या 25 वर्ष 285 व्या दिवशी ही कामगिरी केली. शुबमनने यासह विराटचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने वयाच्या 26 वर्ष 34 दिवशी कर्णधार म्हणून पदार्पणात शतक केलं होतं. (Photo Credit: Getty Images)

विशेष म्हणजे शुबमनने विराटप्रमाणे कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात चौथ्या स्थानी खेळताना शतक केलं. विराटने एडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाच ही कामगिरी केली होती. (Photo Credit: PTI)

तसेच शुबमन विदेशात शतक करणारा तिसरा युवा भारतीय कर्णधारही ठरला. हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वयाच्या 23 वर्ष 253 व्या दिवशी केला होता. तर दिग्गज कपिल देव यांनी 24 वर्ष 64 व्या दिवशी ही कामगिरी केली होती. (Photo: PTI)