
इंग्लंड विरूद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने त्याने 311 चेंडूत 21 चौकार आणि 2 षटकार मारत 64.31 च्या स्ट्राईक रेटने द्विशतक ठोकलं. यासह शुबमन गिलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

शुबमन गिल हा SENA देशांमध्ये द्विशतक करणारा पहिला आशियाई कर्णधार बनला आहे. याआधीचा सर्वोत्तम विक्रम तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता. त्याने 2011 मध्ये लॉर्ड्स येथे 193 धावा केल्या होत्या.

इंग्लंडमध्ये द्विशतकी खेळी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. इंग्लंडमध्ये सर्वात मोठी कसोटी खेळणारा भारतीय कर्णधार बनला आहे. गिलने मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. अझरुद्दीनने ऑगस्ट 1990 मध्ये मँचेस्टर कसोटी सामन्यात 179 धावांची खेळी खेळली.

भारताच्या कसोटी कर्णधार म्हणून द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने एकूण 7 द्विशतकं ठोकली आहेत. तर एमएके पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, शुबमन गिल यांनी प्रत्येकी एक द्विशतक ठोकलं आहे.

भारताचा सर्वात तरूण कर्णधार म्हणून कसोटीत द्विशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.एमएके पतौडी यांनी 1964 मध्ये 23 वर्षे 39 दिवसांचे असताना विरुद्ध इंग्लंडविरुद्ध, शुबमन गिलने 25 वर्षे 298 दिवसांचा असताना इंग्लंड विरुद्ध, सचिन तेंडुलकरने 1999 मध्ये 26 वर्षे 189 दिवसांचा असताना न्यूझीलंडविरुद्ध, विराट कोहलीने 27 वर्षे 260 दिवसांचा असताना 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक ठोकलं होतं.

2016 मध्ये नॉर्थसाउंड येथे विराट कोहलीने केलेल्या 200 धावा केल्या होत्या. त्यानंतर परदेशातील कसोटीत भारतीय कर्णधाराने केलेले हे दुसरे द्विशतक आहे. शुबमन गिल आता इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 1979 मध्ये ओव्हल येथे सुनील गावस्कर यांच्या 221 धावांना मागे टाकले आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)