1..2..3.. नाही तर कर्णधार गिलकडून 36 चुका! आपल्याच खेळाडूंनी तोंडावर पाडलं
भारत श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलला तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. कारण सुरूवातीला त्याने दोन्ही रिव्ह्यू वाया घालवले. असं असताना सोशल मीडियावर गिलचा एक आकडा व्हायरल होत आहे.

कर्णधार शुबमन गिलचं नेतृत्व गेल्या काही महिन्यात आणखी कणखर होत चालल्याचं दिसत आहे. फलंदाजीतही शुबमन गिल चांगली कामगिरी करत आहे. पण त्याच्या नावावर एक नकोशी आकडेवारी नोंदवली गेली आहे. (Photo: BCCI Twitter)

कर्णधार शुबमन गिल डीआरएस रिव्ह्यू घेण्यात नकोसा विक्रम रचला आहे. कर्णधार शुबमन गिलने कर्णधारपदाच्या कार्यकाळात 41 रिव्ह्यू घेतले. त्यात फक्त पाच रिव्ह्यू योग्य ठरले. (Photo: BCCI Twitter)

शुबमन गिलने क्षेत्ररक्षण करताना 36 रिव्ह्यू वाया घालवले आहे. याचा दोष फक्त त्याच्या एकट्याच्या नाही तर इतरांच्याही माथ्यावर आहे. कारण विकेटकीपर आणि गोलंदाजांनी तसा निर्णय घेण्यास त्याला भाग पाडलं. (Photo: BCCI Twitter)

गॉल कसोटी सामन्यात शुबमन गिलने रिव्ह्यू घेताना दोन चुका केला. टीम इंडिया गोलंदाजी करत असताना 30व्या आमि 35 षटकात त्याने रिव्ह्यू वाया घालवले. (Photo: BCCI Twitter)

पहिला रिव्ह्यू मानव सुथारच्या गोलंदाजीवर सोनल दिनुषाला बाद करण्यासाठी गमावला. त्यानंतर दुसरा रिव्ह्यू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर निरोशन डिकवेलाच्या विकेटसाठी गमवून बसला. पण या दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त खेळी आहे. (Photo: BCCI Twitter)