
एजबेस्टन कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या कर्णधार शुबमन गिलमुळे भारताला विजय सोपा झाला. त्याच्या या कामगिरीमुळे आयसीसी कसोटी क्रमवारीत त्याला जबरदस्त फायदा झाला आहे. नव्या क्रमवारीत त्याने 15 खेळाडूंना मागे टाकत झेप सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. (फोटो- बीसीसीआय)

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर 21व्या क्रमांकावर असलेला शुबमन गिल आता दुसऱ्या कसोटीनंतर सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा उपकर्णधार हॅरी ब्रुक नंबर 1 स्थानावर आहे. तर जो रूटची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. (फोटो- बीसीसीआय)

शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यासाठी आला तेव्हा त्याच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण गिलने पहिल्याच कसोटीत शतक झळकावून टीकाकारांना शांत केले. त्यानंतर एजबेस्टन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलने शानदार कामगिरी केली. (फोटो- बीसीसीआय)

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावणाऱ्या गिलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्याने एजबेस्टन कसोटीत 430 धावा केल्या. या कामगिरीच्या आधारे 807 रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर स्थान मिळाले. (फोटो- बीसीसीआय)

केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर, यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर आणि स्टीव्ह स्मिथ पाचव्या स्थानावर आहे. टेम्बा बावुमा सातव्या स्थानावर आहे तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा ऋषभ पंत एका स्थानाने घसरून आठव्या स्थानावर आला आहे. (फोटो- बीसीसीआय)

लॉर्ड्स कसोटी सुरू होणार आहे आणि या सामन्यातील धावा काढणारे खेळाडू पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतील. सध्या सहाव्या क्रमांकावर असलेला गिल कसोटी मालिकेच्या अखेरीस कुठे असेल हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. (फोटो- बीसीसीआय)