
शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशी कामगिरी केली. शुबमनला आयसीसीकडून जुलै महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ या पुरस्काराने गौरवण्यात आलं. आयसीसीनेच याबाबतची माहिती दिली. शुबमनने यासह आशिया कप स्पर्धेआधी पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Shubman Gill X Account)

शुबमनने इंग्लंड दौऱ्यात फलंदाजाची भूमिका चोखपणे पार पाडली. शुबमन या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने या मालिकेत 76 च्या सरासरीने एकूण 754 धावा केल्या. शुबमनने या दरम्यान 4 शतकं ठोकली. (Photo Credit : Shubman Gill X Account)

शुबमनने 754 पैकी 567 धावा या जुलै महिन्यात केल्या. शुबमनने जुलै महिन्यात एकूण 3 शतकं झळकावली. शुबमनने एजबेस्टनमध्ये झालेल्या एकाच सामन्यात एकूण 430 धावा केल्या. शुबमनने पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 161 धावांची खेळी केली. (Photo Credit : Shubman Gill X Account)

शुबमनने केलेल्या या कामगिरीसाठी आयसीसीने त्याचा जुलै महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारने सन्मान केला. शुबमन यासह सर्वाधिक 4 वेळा आयसीसीचा हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला. (Photo Credit : Shubman Gill X Account)

शुबमनने याबाबतीत पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याचा रेकॉर्ड ब्रेक केला. बाबरने आयसीसीकडून देण्यात येणारा पुरस्कार 3 वेळा जिंकला होता. मात्र आता शुबमनने क्रिकेट विश्वात नवा विक्रम केला आहे. (Photo Credit : Shubman Gill X Account)