
भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टी 20i सामन्यात 48 धावांनी मात करत सलग दुसरा सामना जिंकला. तसेच मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. उपकर्णधार शुबमन गिल याने भारतासाठी या सामन्यात सर्वाधिक 46 धावा केल्या. मात्र या खेळीचा अपवाद वगळता शुबमनला गेल्या काही सामन्यांपासून त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीय. (Photo Credit: PTI)

शुबमनने भारताला आतापर्यंत अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. तसेच शुबमनने बॅटिंगने आपली छाप सोडलीय. मात्र शुबमन गेल्या काही सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलाय. शुबमनने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या 3 टी 20i सामन्यांमध्ये एकूण 57 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

शुबमन गिल याचं आशिया कप 2025 स्पर्धेतून टी 20i संघात कमबॅक झालं होतं. तेव्हापासून शुबमन ओपनर म्हणून बॅटिंगसाठी येत आहे. मात्र शुबमनला तेव्हापासून अर्धशतकही करता आलेलं नाही. तसेच आकडेवारीवरुन शुबमन गेल्या 3 वर्षांतील टीम इंडियाचा सर्वात अपयशी ओपनर असल्याचं स्पष्ट होतं. (Photo Credit: PTI)

जानेवारी 2023 पासून टीम इंडियाच्या सलामीवीर फलंदाजांमध्ये सर्वाधिक 30 डावांत शुबमनची सरासरी ही 28.73 इतकी आहे. तर शुबमनचा स्ट्राईक रेट 141.20 इतका राहिलाय. शुबमनने या दरम्यान 3 अर्धशतकं आणि 1 शतकासह 747 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

शुबमन गिल या कालावधी दरम्यान टीम इंडियाच्या सक्रीय ओपनर्सच्या यादीत सरासरी आणि स्ट्राईक रेटबाबत पाचव्या स्थानी आहे. या यादीत अभिषेक शर्मा पहिल्या, संजू सॅमसन दुसऱ्या, यशस्वी जैस्वाल तिसऱ्या आणि ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. (Photo Credit: PTI)