17587 कोटी रुपयांची आरसीबी फ्रेंचायझी खरेदीसाठी या कंपन्यांचा पुढाकार, एकाकडे आधीच आहे संघ

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बरीच उलथापालथ होताना दिसत आहे. या स्पर्धेपूर्वी आरसीबी फ्रेंचायझी विकायला काढली आहे. यासाठी काही कंपन्यांनी रसही दाखवला आहे. त्यामुळे आरसीबी संघाला पुढच्या पर्वात नवा मालक मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. या शर्यतीत कोणत्या कंपन्या आहेत ते जाणून घेऊयात.

Updated on: Oct 17, 2025 | 5:05 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी गतविजेचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु नव्या मालकाच्या शोधात आहे. फ्रेंचायझीची किंमत अंदाजे 17587 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. क्रिकबझच्या बातमीनुसार, सहा कंपन्यांनी फ्रेंचायझी खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे किंमतीच्या अधिक रक्कमही मिळू शकते. आयपीएल संघाची मालकी असलेली कंपनीही या शर्यतीत उतरली आहे. (Photo- PTI)

2 / 5
डियाजिओने कंपनीने मालकी हक्क असलेली आरसीबी आयपीएल संघ विकण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण ब्रिटीश मद्य कंपनी शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलू शकते. कारण डियाजियोची भारतीय शाखा कंपनीच्या निर्णयाशी अनुकूल नाही आणि आरसीबीला कायम ठेवावे असे त्यांचे मत आहे. त्यामुळे काय होतं याकडे लक्ष लागून आहे. (Photo- PTI)

3 / 5
क्रिकबझच्या वृत्तानुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांनी फ्रेंचायझी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पूनावाला यांच्या शिवाय जेएसडब्ल्यू ग्रुप आणि अदानी ग्रुप देखील इच्छुक आहेत. दिल्लीतील एक अब्जाधीश उद्योगपती आणि दोन अमेरिकन खासगी इक्विटी फर्मने देखील यासाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे. (Photo- TV9 Network)

4 / 5
अदानी समूहाचा आयपीएलमध्ये रस सर्वज्ञात आहे. 2022 मध्ये बीसीसीआयने दोन नवीन संघ विकले तेव्हा अदानी समूह गुजरात संघ घेण्यापासून वंचित राहिला. दुसरीकडे,  जिंदाल ग्रुपकडे दिल्ली कॅपिटल्समध्ये 50 टक्के हिस्सा आहे. पण त्यांनी आरसीबीसाठी बोली लावली तर त्यांना दिल्ली फ्रेंचायझीतून बाहेर पडावे लागेल. (Photo- TV9 Network)

5 / 5
डियाजियोने विक्रीबाबत सल्ला देण्यासाठी सिटीसह दोन खासगी बँकांना कामावर ठेवले असल्याचे बोलले जाते. हा व्यवहार पूर्ण होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ट्रेड विंडो आणि मिनी लिलावापूर्वी या फ्रेंचायझीचं  काय होतं याकडे लक्ष लागून आहे. मागच्या पर्वात आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं.