SMAT 2025: इशान किशनचा धूमधडाका, टी20 संघाची घोषणा होण्याआधीच ठोकला दावा

इशान किशनने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दौरा अर्धवट सोडला आणि त्याच्यासाठी टीम इंडियाची दारंच बंद झाली अशी स्थिती आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅकसाठी प्रयत्न करत आहे. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टी20 संघाची घोषणा होण्यापूर्वी त्याने दमदार खेळी केली आहे.

Updated on: Dec 02, 2025 | 9:45 PM
1 / 5
इशान किशन सध्या टीम इंडियापासून दूर आहे. 2023 मध्ये भारतीय संघातून खेळला होता. तेव्हापासून इशान किशन भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी धडपड करत आहे. सध्या इशान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडचे नेतृत्व करत आहे.   (फोटो- PTI)

2 / 5
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 2 डिसेंबर रोजी झारखंड विरुद्ध सौराष्ट्र सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधार इशान किशनने सौराष्ट्रविरुद्ध शानदार खेळी केली. अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.  (फोटो- Harry Trump/Getty Images)

3 / 5
सौराष्ट्रविरुद्ध इशान किशनने शानदार अर्धशतक झळकावले. पण त्याचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. त्याने 50 चेंडूत 93 धावा केल्या. त्याच्या डावात त्याने सौराष्ट्रविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. यात त्याने 11 चौकार आणि तीन षटकार मारले. (Photo: Matt Roberts-ICC/ICC via Getty Images)

4 / 5
इशान किशन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे लवकरच टीम इंडियात स्थान मिळू शकते. पण टी20 संघात स्थान मिळणं सध्यातरी कठीण आहे. कारण ऋषभ पंत, अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलमुळे त्याला जागा मिळणं कठीण दिसत आहे. (फोटो- Steve Bardens-ICC/ICC via Getty Images)

5 / 5
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत झारखंडकडून खेळताना इशान किशनने त्रिपुराविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. तेव्हा त्याने 50 चेंडूत 113 धावा केल्या होत्या. त्या खेळीदरम्यान इशानने 10 चौकार आणि 8 षटकार मारले होते. (फोटो- Ryan Pierse-ICC via Getty Images)