स्मृती मंधानाचा प्रियकर पलाश मुच्छलने असा साजरा केला वनडे वर्ल्डकप विजयाचा आनंद, पाहा फोटो

भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण केलं आहे. भारताची स्टार क्रिकेटपटून स्मृती मंधानाने विजयाचा आनंद प्रियकर पलाश मुच्छलसोबत साजरा केला. या जल्लोषाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated on: Nov 03, 2025 | 5:38 PM
1 / 5
भारतीय महिला संघाने दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारत जेतेपद आपल्या नावावर केलं. भारताने पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. या विजयाचा आनंद संपूर्ण देशात साजरा करण्यात आला. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने हा खास क्षण खेळाडूंसह प्रियकर पलाश मुच्छलसोबत साजरा केला. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

2 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी संगीत आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल स्टेडियममध्ये उपस्थित होता. टीम इंडियाच्या विजयानंतर पलाश मुच्छल मैदानात उतरला आणि स्मृती मंधानासोबत जल्लोष केला. पलाश मुच्छलने या प्रसंगाचे काही फोटो सोशल मिडिया खात्यावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

3 / 5
पलाश मुच्छलने इंस्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात स्मृती मंधाना सोबत दिसत आहे. या फोटो दोघांनी तिरंगा गळ्यात टाकला आहे. तसेच त्यांच्या हातात वर्ल्डकप ट्रॉफी आहे. त्याने हा फोटो शेअर करताना लिहिलं की,  'मी अजूनही हे स्वप्न पाहात आहे.' आणखी एका पोस्टमध्ये स्मृती हसताना दिसत आहे आणि पलाशच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

4 / 5
स्मृती मंधाना आणि पलाश गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. पलाश मुच्छलने एका कार्यक्रमात मीडियाशी चर्चा करताना सांगितलं की, 'लवकरच ती इंदुरची सून होणार आहे. बस इतकं सांगू इच्छितो.' (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

5 / 5
पलाश मुच्छलने आपल्या हातावर स्मृती मंधानाचा खास टॅटू काढला आहे. यात 'SM18' असं लिहिलं आहे. हा टॅटू स्मृती मंधानाच्या नावाचा आहे. त्यात तिची बर्थ डेट आणि जर्सीचा नंबर दिला आहे. तिची बर्थ डेट ही 18 जुलै आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती 18 नंबरची जर्सी परिधान करते. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)