वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्मृती मंधाना दुसऱ्यांदा फेल, 12 धावांनी मोठ्या विक्रमाची संधी हुकली

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्मृती मंधानाकडून टीम इंडिया आणि चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. पण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात स्मृती मंधाना फेल गेली. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध मोठा विक्रम रचण्याची संधी हुकली आहे. वनड वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी तिने दोन शतकं ठोकली होती. पण अचानक तिच्या फॉर्मला काय झाला असा प्रश्न पडला आहे.

| Updated on: Oct 05, 2025 | 9:03 PM
1 / 5
भारताची सलामीवर स्मृती मंधानाकडून वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिने फक्त 8 धावा काढल्या होत्या. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा निराश केलं आहे. (Photo- PTI)

2 / 5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 32 चेंडूत 23 धावा करून बाद झाली. त्यामुळे तिची संधी अवघ्या 12 धावांनी हुकली. एका कॅलेंडर वर्षात वनडे सर्वाधिक धावा करण्याची तिच्याकडे संधी होती. पण तसं काही झालं नाही. (Photo- PTI)

3 / 5
2025 या वर्षात स्मृती मंधानाची कामगिरी चांगली राहिली आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन शतकं झळकावली होती. तिने या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 959 धावा केल्या आहे. आता पुढच्या सामन्यात 12 धावा करताच 28 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढेल. (Photo- PTI)

4 / 5
महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ब्लेंडा क्लार्कच्या नावावर आहे. तिने 1997 मध्ये महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 970 धावा केल्या होत्या. स्मृती मंधाना या विक्रमापासून फक्त 12 धावा दूर आहे. (Photo- Philip Brown/Getty Images)

5 / 5
स्मृती मंधानाने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात तिने 25.66 च्या सरासरीने फक्त 77 धावा केल्या आहेत. यात एक अर्धशतक आहे. (Photo- PTI)