काव्या मारनचा मास्टरस्ट्रोक! भारत इंग्लंड टी20 सामन्यातच सर्व काही झालं उघड

आयपीएल मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादची बोली पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. कारण 29 वर्षीय ब्रेडन कार्ससाठी 1 कोटी रुपये मोजले होते. पण फक्त 4 सामने खेळलेल्या कार्सने निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे.

| Updated on: Jan 26, 2025 | 5:22 PM
1 / 5
दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवत मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आरसीबीचे दोन तगडे फलंदाज अपयशी ठरले. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू मात्र चमकला. इंग्लंडकडून ब्रेडन कार्सने चांगली कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात गुस एटकिंगसनच्या जागी त्याला संघात स्थान मिळालं होतं.

2 / 5
भारतात प्रथमच खेळत असलेल्या ब्रेडन कार्स याने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केलं. आठव्या क्रमांकावर उतर त्याने 17 चेंडूत 3 उत्तुंग षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 31 धावा केल्या. पण जोफ्रा आर्चरलच्या चुकीमुळे धावचीत झाला.

3 / 5
गोलंदाजीत ब्रेडन कार्सने बाउंसर चेंडूंचा जोरदार मारा केला.  पहिल्याच षटकात आक्रमक संजू सॅमसनची विकेट घेतली. तर सूर्यकुमार यादवला क्लिन बोल्ड केले. वॉशिंग्टन सुंदरचा त्रिफळा उडवून त्यालाही तंबूत पाठवले.

4 / 5
ब्रेडन कार्सने फलंदाजीत 17 चेंडूत 31 धावा आणि 4 षटकात 29 धावा आणि गोलंदाजीत 3 बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली. ब्रेडन कार्सच्या या शानदार कामगिरीने सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन खूप खूश आहे.

5 / 5
आयपीएलमध्ये ब्रेडन कार्स सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे. यावेळच्या आयपीएल मेगा लिलावाद्वारे सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने ब्रेडन कार्सला 1 कोटी रुपयांना विकत घेतले.