
आयपीएल 2025 स्पर्धेत वेंकटेश अय्यर पैसा वसूल फलंदाजी केली. त्याने 29 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 60 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकात 6 गडी गमवून 200 धावांपर्यंत मजल मारता आली. (Photo- KKR Twitter)

वेंकटेश अय्यरने फलंदाजीला आला तेव्हा काही खास सुरुवात केली नाही. समालोचकही त्याच्या फलंदाजीवरून डिवचत होते. पहिल्या 10 चेंडूत त्याने फक्त 11 धावा केल्या. त्यानंतर 11 ते 20 चेंडूत 19 धावांची खेली केली. पण 21 ते 29 चेंडूत आक्रमक फटकेबाजी करत 30 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 333.3 इतका होता. (Photo- KKR Twitter)

वेंकटेश अय्यर पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादवर भारी पडला असंच म्हणावं लागेल. कारण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सलग तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. 2024 आयपीएल प्लेऑफच्या सामन्यात 28 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. त्यानंतर अंतिम फेरीत 26 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या होत्या. तर या पर्वातील पहिल्या सामन्यात 29 चेंडूत 60 धावा केल्या. (Photo- KKR Twitter)

वेंकटेश अय्यरच्या नावावर आणखी एका विक्रमची नोंद झाली आहे. हैदराबाद फ्रेंचायझीविरुद्ध सलग अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. संजू सॅमसनने 2021-23 या कालावधीत 4 अर्धशतकं, फाफ डु प्लेसिसने 2022-24 या कालावधीत 3 आणि आात वेंकटेश अय्यरने 2024-25 या कालावधीत 3 अर्धशतकं ठोकली आहे. (Photo- KKR Twitter)

वेंकटेश अय्यरने सांगितलं की, ' मी स्क्रीनवरून सामना पाहत होतो, शॉट्स खेळणे सोपे नव्हते.चेंडू थांबून येत होता. अजिंक्य आणि अंगकृष यांनी आमच्यासाठी डाव सेट अप करून दिला. त्याची खूप मदत झाली.' (Photo- PTI)