
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी 20 संघ जुंपले आहेत. श्रीलंका आणि भारताकडे यजमानपद असल्याने दोन्ही संघ जोमाने तयारी करत आहेत. होमग्राउंडवर सामने होणार असल्याने दोन्ही त्याचा फायदा घेण्यास आतुर आहेत. असं असताना या स्पर्धेपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (फोटो- PTI)

भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकाची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रम राठोड यांना श्रीलंकेने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे श्रीलंकन फलंदाजांना गोलंदाजांचा सामना करण्याचे धडे मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. (फोटो- PTI)

विक्रम राठोड यांनी 2024 च्या टी20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाच्या काळातच टीम इंडिया टी20 विश्वचषक विजेती बनली. त्यामुळे आता श्रीलंकेच्या ताफ्यात रूजू झाल्याने त्यांना नक्कीच फायदा होणार असं क्रीडाप्रेमी बोलत आहेत. (ICC Photo)

विक्रम राठोड हे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे सहाय्यक प्रशिक्षक देखील आहेत. आता ते श्रीलंकेला सेवा देणार आहेत आणि त्यांना 2026 चा टी20 विश्वचषक जिंकण्यास मदत करणार आहेत. विक्रम राठोड 15 जानेवारी रोजी श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. (फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)

विक्रम राठोर 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान होणाऱ्या श्रीलंकेच्या पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेचा भाग असणार नाहीत. पण टी20 विश्वचषकापूर्वी संघाच्या उणीवा दूर करण्यासाठी ते एक शिबिर आयोजित करतील. आता त्याच्या कारकिर्दीत श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)