
इंग्लंडने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात इटलीचा 24 धावांनी धुव्वा उडवला आणि सुपर 8 फेरीत स्थान पक्कं केलं. या सामन्यात इंग्लंडने 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण इटलीचा संघ 178 धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्याच्या निकालानंतर क गटाचं चित्र स्पष्ट झालं आहे. इटली, स्कॉटलँड आणि नेपाळ हे संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. या सामन्यात काही विक्रमांची नोंद झाली ते जाणून घेऊयात.. (Photo- England Cricket Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असोसिएट संघाकडून जलद अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इटलीच्या बेन मॅनेंटीने एन्ट्री मारली आहे. या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँडच्या स्टीफन मायबर्गने आयर्लंडविरुद्ध 2014 मध्ये 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आता 2026 मध्ये बेन मॅनेंटीने इंग्लंडविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. अमेरिकेच्या आरोन जोन्सनेही 2024 मध्ये 22 चेंडूत कॅनडाविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. (Photo- ICC Cricket Twitter)

विल जॅक्सने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडसाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकलं. यापूर्वी हा विक्रम जोस बटलर आणि इऑन मॉर्गनच्या नावावर होता. मॉर्गनने 2012 मध्ये 25 चेंडूत, तर जोस बटलरने 2021 मध्ये 25 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. (Photo- England Cricket Twitter)

इंग्लंडने त्यांच्या डावात 12 षटकार मारले. इंग्लंडचे टी20 विश्वचषकातील सर्वाधिक षटकार आहेत. तर इटलीने इंग्लंडविरुद्ध 13 षटकार मारले. या सामन्यात एकूण 25 षटकार मारले गेले. (Photo- England Cricket Twitter)

20वं षटक निर्धाव टाकण्याची ही टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरी वेळ आहे. यापूर्वी मोहम्मद आमीरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2010 मध्ये 3 विकेट घेतल्या आणि एकही धाव दिली नाही. तर इंग्लंडच्या जेमी ओव्हरटनने इटलीविरुद्ध 20वं षटक निर्धाव टाकत 2 विकेट घेतल्या. (Photo- England Cricket Twitter)