
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 12 व्या सामन्यात भारत श्रीलंका हे संघ आमनेसामने आले. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. भारताला विजयासह नेट रनरेटही राखायचा आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं आहे. (Photo : BCCI Twitter)

भारताकडून स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी जबरदस्त सुरुवात करुन दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 98 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरचं वादळ पाहायला मिळालं. (Photo : BCCI Twitter)

कर्णधार हरमनप्रीत कौरने 27 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार मारत 52 धावा केल्या. तिच्यामुळेच संघाला दीडशेहून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला आहे.वुमन्स क्रिकेटमधील भारताकडून हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. (Photo : iCC Twitter)

हरमनप्रीत कौरने 27 चेंडूत नाबाद अर्धशत केलं. यापूर्वी हा विक्रम स्मृती मंधानाच्या नावावर होता. तिने 31 चेंडूत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. तर 32 चेंडूत हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 33 चेंडूत न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. तर 36 चेंडूत मिताली राजने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. (Photo : BCCI Twitter)

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे तिचं टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 13वे अर्धशतक आणि श्रीलंकेविरुद्धचे दुसरे अर्धशतक होते.हरमनप्रीतने श्रीलंकेविरुद्ध 24 सामने खेळले आहेत. 19 डावात 31 च्या सरासरीने 434 धावा केल्या आहेत.