
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अतितटीचा सामना दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात रंगला. या दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशसमोर विजयासाठी फक्त 114 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांगलादेशला 109 धावा करता आल्या आणि 4 धावांनी पराभव सहन करावा लागला.

दक्षिण अफ्रिकेने ड गटातून सुपर 8 फेरीसाठी आपला दावा पक्का केला आहे. मात्र बांगलादेश आणि नेदरलँडही रेसमध्ये असल्याने अजूनही कोणी क्वॉलिफाय झालेला नाही.

दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानशी बरोबरी केली आहे. तर भारतीय संघाला मागे टाकलं आहे. दक्षिण अफ्रिकेचा बांगलादेशविरुद्ध सलग नववा विजय आहे.

पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध सलग 9 सामने जिंकले आहेत. आता हा मान दक्षिण अफ्रिकेलाही मिळाला आहे. भारताने बांगलादेशला सलग 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभूत केलं आहे. या यादीत न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर असून त्यांनी सलग 10 सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं आहे.

दक्षिण अफ्रिकेचं सुपर 8 फेरीसाठी जवळपास निश्चित आहे. तर बांगलादेशला अजूनही संधी आहे. बांगलादेशने आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर सुपर 8 फेरीचं तिकीट मिळू शकतं. (सर्व फोटो- साउथ अफ्रिका ट्वीटर)