T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या 42 खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना भारतीय व्हिसाचं टेन्शन, कसं काय ते जाणून घ्या

भारताच्या कडक व्हिसा धोरणामुळे झालेल्या विलंबाचा परिणाम पाकिस्तानी वंशाच्या सदस्यांवर झाला. इंग्लंड, नेदरलँड्स आणि अमेरिकेसह अनेक संघांच्या 42 जणांना व्हिसासाठी धावाधाव करावी लागली. अखेर आयसीसीने हस्तक्षेप केला आणि व्हिसा मंजूर झाला.

| Updated on: Jan 19, 2026 | 9:22 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि श्रीलंका या देशात होत आहे. पाकिस्तानचे सामने भारतात होणार नाहीत. त्यांचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय व्हिसा देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. पण इतर संघांना भारतीय व्हिसा मिळवताना अडचणींचा सामना करावा लागला.  (फोटो-Gareth Copley/Getty Images)

2 / 5
आयसीसीने भारतात होणाऱ्या टी20  वर्ल्डकप 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या सर्व 42 खेळाडू आणि अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या व्हिसा समस्येचे निराकरण करण्यासाठी पावले उचलली आहेत.इंग्लंडचे पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आदिल रशीद, रेहान अहमद आणि वेगवान गोलंदाज साकिब महमूद यांचे व्हिसा अर्ज आधीच मंजूर झाले आहेत. (फोटो-AFP)

3 / 5
नेदरलँड्स संघाचे सदस्य आणि कॅनेडियन सपोर्ट स्टाफ शाह सलीम जाफर यांनाही व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. अमेरिकन संघात अली खान आणि शायान जहांगीरसारखे काही पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. संयुक्त अरब अमिराती, इटली, बांगलादेश आणि कॅनडा या देशांच्या संघात पाकिस्तानी राष्ट्रीयत्वाचे किंवा पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आणि अधिकारी आहेत. (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
पाकिस्तानशी संबंध बिघडल्यामुळे, भारत सरकारने अलीकडेच हे व्हिसा धोरण स्वीकारले आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या कोणत्याही संघातील पाकिस्तानी वंशाच्या सदस्यांसाठी व्हिसा पडताळणी अधिक कडक असते. यामुळे अनेकदा विलंब होतो.या सर्वांना व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. (Photo_ PTI)

5 / 5
2023 च्या विश्वचषकादरम्यान संपूर्ण पाकिस्तानी संघाच्या व्हिसा प्रक्रियेलाही विलंब झाला होता. त्याचप्रमाणे, 2024 मध्ये कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा भाग असलेल्या रेहान आणि शोएब बशीर सारख्या खेळाडूंच्या व्हिसा प्रक्रियेलाही वेळ लागला. (PC-PTI)