
क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 19 पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकु सिंग याला गूड न्यूज मिळाली आहे. रिंकूची उत्तर प्रदेश राज्य सरकारमध्ये प्रादेशिक क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. (Photo Credit: PTI)

रिंकु सिंह याला लखनौतील लोकभवनमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.रिंकू व्यतिरिक्त यावेळेस भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणाऱ्या खेळाडूंनाही नियुक्ती पत्र दिलं जाणार आहे. (Photo Credit: PTI)

रिंकुला स्पोर्ट्स कोट्यातून हे पद मिळालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिंकूला या पदासाठी राज्य सरकारकडून दरमहा 50 ते 60 हजार रुपये वेतन मिळणार आहे. यामध्ये विविध भत्त्यांचा समावेश असणार आहे. (Photo Credit: PTI)

रिंकु सध्या आयपीएलच्या 19 व्या मोसमाची तयारी करत आहे. रिंकु केकेआरच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. रिंकूने केकेआरला आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावर विजयी केलं आहे. (Photo Credit: PTI)

रिंकु व्यतिरिक्त राजकुमार पाल आणि इतर 4 खेळाडूंना युपी सरकारकडून नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. राजकुमार पाल हे कांस्य पदकविजेत्या संघाचे सदस्य होते. (Photo Credit: PTI)