
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीनंतर पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पुन्हा लोळवलं. भारताने यासह 21 सप्टेंबरला पाकिस्तानचा धुव्वा उडवत सुपर 4 फेरीत विजयी सुरुवात केली होती. टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध त्या सामन्यात 74 धावांची स्फोटक खेळी केली होती. (Photo Credit : Acc)

अभिषेक शर्मा याने केलेल्या या खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला होता. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात केली होती. (Photo Credit : Acc)

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीला उचकवण्याचा प्रयत्न केला होता. या जोडीचं फटकेबाजीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हारीसने डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या सलामी जोडीने बॅटनेच उत्तर देत पाकिस्तानची मस्ती जिरवली होती. (Photo Credit : X)

पाकिस्तानचे गोलंदाज आणि खेळाडू अभिषेक शर्माला रोखण्यात निष्प्रभ ठरले. पाकिस्तान अभिषेक शर्मासमोर काहीही करु शकले नाही. त्यामुळे अभिषेकसमोर ऑन फिल्ड अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने ऑफ फिल्ड निचपणाची पातळी गाठली. चिडलेल्या पाकिस्तान्यांनी अभिषेक शर्मा याच्या एक्स अकाउंटला रिपोर्ट केल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Acc)

पाकिस्तानमधील काही जणांनी अभिषेक शर्माच्या एक्स अकाउंटला रिपोर्ट केलं. त्यामुळे अभिषेकचं अकाउंट सर्च होत नाहीय. अभिषेकचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. (Photo Credit : Acc)

दरम्यान हारीसने डिवचल्यानंतर अभिषेकने आणखी जोरात फटकेबाजी केली. अभिषेकने पाकिस्तान विरुद्ध एकूण 74 धावांची खेळी केली. अभिषेकने या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार लगावले. (Photo Credit : Acc)