Shubman Gill : रेकॉर्डवर रेकॉर्ड, एका झटक्यात विराट-गावसकरांचा विक्रम मोडीत, शुबमनचा कारनामा

England vs India 2nd Test : इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात भारतीय कर्णधार शुबमन गिल याने इतिहास घडवला. शुबमनने पहिल्या डावातील द्विशतकानंतर दुसऱ्या डावात शतक केलं. शुबमनने यासह अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. जाणून घ्या.

| Updated on: Jul 05, 2025 | 11:57 PM
1 / 5
शुबमन गिल याने कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत इंग्लंड दौऱ्यात धावांचा पाऊस पाडत धमाका केला आहे. शुबमनने लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत शतक केलं. शुबमनने हाच झंझावात कायम ठेवत दोन्ही डावात मोठा कारनामा केला. शुबमनने पहिल्या डावात 269 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात शतक ठोकलं. (Photo Credit :  PTI)

2 / 5
शुबमन एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा क्रिकेट विश्वातील नववा फलंदाज ठरला आहे. तसेच शुबमन भारताकडून असा कारनामा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. शुबमनआधी सुनील गावसकर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज विरुद्ध अशीच कामगिरी केली होती.  (Photo Credit :  PTI)

3 / 5
शुबमनने द्विशतक आणि शतकासह एकाच सामन्यात एकूण 350 पेक्षा अधिक धावा केल्या. शुबमन यासह भारताकडून एकाच सामन्यात अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. शुबमनआधी गावसकरांनी 1971 साली विंडीज विरुद्ध एकाच सामन्यात एकूण 344 धावा केल्या होत्या. (Photo Credit :  PTI)

4 / 5
शुबमनने अशाप्रकारे कर्णधार म्हणून नव्या प्रवासाची अविस्मरणीय अशी सुरुवात केली. शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या या मालिकेतील 2 सामन्यांमधील 4 डावांत एकूण 500 पेक्षा अधिक धावा केल्या. शुबमन यासह कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय ठरला. शुबमनने विराट कोहली याच्या 449 धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला.(Photo Credit :  PTI)

5 / 5
शुबमन सेना देशात एका कसोटी सामन्यात 300 पेक्षा धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला.  तसेच शुबमनने इंग्लंडमध्ये 300 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला. (Photo Credit :  PTI)