
टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू प्रसिद्ध कृष्णा याचा साखरपूडा पार पडला आहे. प्रसिद्धच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रसिद्ध या फोटोत आपल्या भावी पत्नीसोबत दिसत आहे.

प्रसिद्धचे 2 फोटो समोर आले आहेत. प्रसिद्धने पहिल्या फोटोत आपल्या भावी पत्नीच्या खांद्यावर हाट टाकलेला आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसले आहेत. दोघेही हळदीत रंगले आहेत.

प्रसिद्ध कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रेस फ्रॅक्चरचा सामना करतोय. या दुखापतीमुळेच प्रसिद्धला आयपीएल 16 व्या मोसमात खेळता आलं नाही.

प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व करतो. प्रसिद्धने टीम इंडियाचं एकूण 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच प्रसिद्धने आयपीएलमध्ये 51 सामने खेळले आहेत.

प्रसिद्धने 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं. प्रसिद्धने एकूण 14 वनडे सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.