World Cup 2025 : वर्ल्ड कप ट्रॉफीसह महिला ब्रिगेडचे खास फोटो, ऐतिहासिक विजयानंतर एकच जल्लोष

Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघासाठी 2 नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरला. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. त्यानंतर या खेळाडूंनी हॉटेल रुममध्ये ट्रॉफीसोबतचे फोटो पोस्ट केले.

| Updated on: Nov 03, 2025 | 6:34 PM
1 / 5
वूमन्स टीम इंडियाने रविवारी 2 नोव्हेंबरला वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवत इतिहास घडवला. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केलं. भारतीय महिला संघाची वर्ल्ड कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit: Instagram/PTI)

2 / 5
भारताला याआधी 2 वेळा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र भारताने तिसऱ्या प्रयत्नात वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्यात यश मिळवलं. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीसोबत एकच जल्लोष केला. (Photo Credit: Instagram/PTI)

3 / 5
जेमीमा रॉड्रिग्स, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि स्मृती मंधाना या चौघींची मैत्री जगजाहीर आहे. या चौघींनी वर्ल्ड कप विजयानंतर ट्रॉफीसोबत आंनदोत्सव साजरा केला. (Photo Credit: Instagram/PTI)

4 / 5
जेमीमाने स्मृती मंधानासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत जेमीमा आणि स्मृती या दोघी  वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसत आहेत. (Photo Credit: Instagram/PTI)

5 / 5
स्मृती मंधाना या स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारी पहिली फलंदाज ठरली. तसेच जेमीमाने उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक करत विजयात प्रमुख भूमिका बजावली.  (Photo Credit: Instagram/PTI)