
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर पाचव्या स्थानी आहे. बटलरने 35 सामन्यांमध्ये 1 हजार 13 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

बांगलादेशचा माजी ऑलराउंडर महमुदुल्लाह या यादीत चौथ्या स्थानी आहे. महमुदुल्लाह बांगलादेशसाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे. महमुदुल्लाह याने 37 सामन्यांमध्ये 458 धावांसह 9 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. वॉर्नरने या स्पर्धेच्या इतिहासात एकूण 41 सामन्यांमध्ये 984 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शाकिबने या स्पर्धेतील 43 सामन्यांमध्ये 853 धावा केल्या आहेत. तसेच 50 विकेट्सही मिळवल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळवण्याचा विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने या स्पर्धेत सर्वाधिक 47 सामने खेळले आहेत. रोहित 2007 या पहिल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेपासून खेळत आहे. तर रोहितने भारताला त्याच्या नेतृत्वात 2024 साली वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (Photo Credit : Icc X Account)