
टीम इंडिया आशिया कप 2023 मधील आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 2 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत.

टीम इंडिया आशिया कपसाठी श्रीलंकेत दाखल झाली आहे. या संपूर्ण आशिया कपमध्ये तिघांवर टीम इंडियाची मोठी जबाबदारी असणार आहे.

रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्रं आहेत. तसेच रोहित ओपनिंग करणार आहे. त्यामुळे रोहितला कॅप्टन्सीसह टीमला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी असेल.

विराट कोहली याने टीम इंडियासाठी आतापर्यंत संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. विराट अनुभवी बॅट्समन आहे. विराट फिल्डिंगही जबरदस्त करतो. त्यामुळे विराटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

हार्दिक पंड्या याच्याकडे टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तसेच हार्दिकचा टीममध्ये ऑलराउंडर म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हार्दिकवर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगसह उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.