
संपूर्ण देशभरात आज भावा-बहिणींच्या नात्याचा अर्थात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनीही आपल्या लाडक्या बहिणींकडून राखी बांधून घेतली. टीम इंडियाच्या आजी-माजी खेळाडूंनी आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

स्टार बॉलर 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह याने त्याच्या लाडक्या बहिणीकडून राखी बांधून घेतली. जसप्रीतने इंस्टा स्टोरीत रक्षाबंधनाचे फोटो पोस्ट केलेत.

टीम इंडियाच्या टी 20 संघाचा कॅप्टन मुंबईकर सुर्यकुमार यादव याने त्याच्या बहिणीसह रक्षाबंधन सणाचा आनंद लुटला. सूर्याने त्याची बहिण दिनल यादव हीने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

स्टार फिनीशर रिंकु सिंह याने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणीसोबतचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. रिंकूने 18 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसऱ्या वर्षात पदार्पण केलं.

वेगवान गोलंदाज दीपक चाहर यानेही रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. दीपकने त्याची बहीण मालती चाहर हीच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

स्पिनर युझवेंद्र चहल यानेही भावा-बहिणीच्या प्रेमाचं प्रतिक असलेल्या रक्षाबंधनाचा सण साजरा केला. चहलने इंस्टा स्टोरीतून खास फोटो पोस्ट केले.