
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 21 जानेवारीपासून टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारताचा न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत पराभव केला.ऋषभ पंत याला या एकदिवसीय मालिकेआधी दुखापत झाली होती. पंतला झालेली दुखापत गंभीर असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पंतला कमबॅकसाठी आणखी वेळ लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतच्या बरगड्यांना दुखात झालीय.पंतला झालेली दुखापत मध्यम स्वरुपाची असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पंतला वेदना होत आहेत. पंतला 15 दिवसांनंतर यातून आराम मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Photo Credit : PTI)

पंतला दुखापतीमुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेला मुकावं लागलं आहे. पंतचं दिल्लीच्या संघात नावही नाही. दिल्लीसमोर पुढील सामन्यात छत्तीसगडचं आव्हान असणार आहे. डीडीसीएने दिलेल्या माहितीनुसार, पंतचं फिट होणं इतक्यात तरी अवघड आहे. (Photo Credit : PTI)

पंतला दुखापतीतून सावरल्यानंतर बंगळुरुतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये जावं लागेल. पंतला तिथे स्वत:चा फिटनेस सिद्ध करावा लागेल. पंत फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यावरच त्याला खेळता येईल. पंतची दुखापत आणि शक्यता पाहता पंत आता थेट आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमातच खेळताना दिसेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

पंतकडे आयपीएल स्पर्धेत एलएसजी अर्थात लखनौ सुपर जायंट्सचं संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. पंत आयपीएल स्पर्धेतील महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. एलएसजीने पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले होते. (Photo Credit : PTI)