व्वा पंत व्वा, सचिन-विराटला जमलं नाही ते ऋषभने करुन दाखवलं, इंग्लंडमध्ये महारेकॉर्ड

Rishabh Pant Double Hundred In an Test : ऋषभ पंत याने उपकर्णधार म्हणून पदार्पणात इंग्लंड विरुद्ध चमकदार कामगिरी केली. पंतने दोन्ही डावात शतक झळकावलं आणि इतिहास घडवला. पंत अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. जाणून घ्या.

| Updated on: Jun 24, 2025 | 4:00 PM
1 / 5
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन आणि उपकर्णधार ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली. पंतने लीड्समधील दोन्ही डावात शतक केलं. पंतने पहिल्या डावात 134 तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. पंतने यासह काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
ऋषभने लीड्समध्ये दोन्ही डावात शतक करुन भारताच्या सर्व आजी-माजी फलंदाजांना मागे टाकलं. पंत इंग्लंडमध्ये टीम इंडियाकडून दोन्ही डावात शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. भारताच्या सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही असं करणं जमलं नाही. (Photo Credit : PTI)

3 / 5
ऋषभ विदेशात दोन्ही डावात शतक करणारा पहिला विकेटकीपर बॅट्समन ठरला आहे. पंतआधी झिंबाब्वेचे माजी विकेटकीपर एंडी फ्लावर यांनी अशी कामगिरी केली होती. मात्र फ्लावर यांनी मायदेशात तसा कारनामा केला होता. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच ऋषभ विदेशात दोन्ही डावात शतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. पंतआधी विराट कोहली, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि विजय हजारे या माजी दिग्ग्जांनी अशी कामगिरी केली आहे. मात्र पंत भारतासाठी इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरलाय. (Photo Credit : PTI)

5 / 5
तसेच पंतने शतकाची हॅटट्रिकही पूर्ण केली. पंतने व्यावसायिक क्रिकेटर म्हणून गेल्या 3 डावात शतक करण्याची कामगिरी केली. पंतने लीड्सआधी आयपीएल 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातही शतक केलं होतं. (Photo Credit : PTI)