
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 13व्या पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केल. या विजयासह भारताने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यंदा वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला क्रीडाप्रेमींची पसंती मिळाली. त्यात भारताने जेतेपद मिळवल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. असं असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. (Photo- PTI)

आयसीसीने आता वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं परीघ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्पर्धेत संघांची संख्या आठवरून 10 करण्याची अधिकृत घोषणा करण्याता आली आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या आयसीसीच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Photo- Pankaj Nangia/Getty Images)

आयसीसीने एका प्रेस रिलीजमध्ये याची घोषणा केली आणि या निर्णयाचे श्रेय अलीकडील विश्वचषकाच्या यशाला दिले. आयसीसीने निवेदनात स्पष्ट केलं की, "या स्पर्धेच्या यशावर भर देण्यासाठी, आयसीसी बोर्डाने स्पर्धेची पुढील पर्वात 10 संघांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." चाहत्यांच्या उत्सुकतेमुळे आणि प्रेक्षकांच्या संख्येमुळे आयसीसीचे मनोबल वाढले आहे. (Photo- PTI)

"जवळपास 3 लाख चाहत्यांनी स्टेडियममध्ये विश्वचषक सामन्यांना हजेरी लावली. यामुळे कोणत्याही महिला क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थितीचा विक्रम मोडला गेला. या स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या वाढली आणि ऑन-स्क्रीन प्रेक्षकांसाठी नवीन विक्रम प्रस्थापित झाले. भारतात 50 कोटी प्रेक्षकांनी सामना पाहिला.", असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. (Photo- PTI)

पुढील महिला वर्ल्डकप स्पर्धा चार वर्षांनंतर 2029 मध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत पहिल्यांदाच 10 संघ सहभागी होतील. या विश्वचषकाचे यजमानपद अद्याप जाहीर झालेले नसले तरी ही स्पर्धेची उत्सुकता अधिक असेल मात्र आताच निश्चित झालं आहे. (Photo- PTI)