दिल्ली कॅपिटल्सचं टेन्शन वाढलं! केएल राहुल आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळणार नाही? कारण…

आयपीएलच्या 18व्या पर्वासाठी दहा संघ सज्ज झाले आहेत. मात्र अजूनही दिल्ली कॅपिटल्स संघाची मोर्चेबांधणी काही होताना दिसत नाही. मेगा लिलाव पार पडल्यानंतर कर्णधाराचा थांगपत्ता नाही. त्यात दिल्ली कॅपिटल्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

| Updated on: Mar 13, 2025 | 3:16 PM
1 / 5
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत केएल राहुलने चांगली कामगिरी करत टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. दुसरीकडे, केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपद नाकारल्याची चर्चा आहे. असं असताना केएल राहुल आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नसल्याची चर्चा रंगली आहे. केएल राहुल एप्रिलच्या मध्यात संघासोबत असेल असं सांगितलं जात आहे.

2 / 5
केएल राहुल सुरुवातीच्या सामन्यात गैरहजर राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याच्या घरी बाळ येणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत अशी माहिती नाही.

3 / 5
केएल राहुल त्याच्या पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या पहिल्या तीन-चार सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये संघात सामील होणार असल्याचे कळते.

4 / 5
दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने केएल राहुलला कर्णधारपद देण्यात रस दाखवला होता. पण केएल राहुलने नकार दिला. एक खेळाडू म्हणून संघात योगदान देऊ इच्छितो असेही त्याने सांगितले. अक्षर पटेल किंवा फाफ डू प्लेसिस दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतील अशी शक्यता आहे.

5 / 5
दिल्ली कॅपिटल्स संघ: अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिशेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेझर-मॅकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डू प्लेसिस, मुकेश कुमार, दर्शन नालकांडे, विप्रज निगम, दुष्मंथा चामीरा, डोनोवन फरेरा, अजय मोंडल, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)