लॉर्ड्स कसोटी खेळण्यासाठी उतरताच स्मृती मंधानाचं ‘त्रिशतक’, अशी कामगिरी करणारी तिसरी भारतीय

IND W vs ENG W Test: भारतीयच संघाची स्टार डावखुरी फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी एक मोठा विक्रम नावावर केला आहे. मैदानात उतरताच तिने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह ती हरमनप्रीत कौर आणि मिताली राजच्या पंगतीत बसली आहे.

| Updated on: Jul 10, 2026 | 5:29 PM
1 / 5
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत एक मोठा पल्ला गाठला आहे.  इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात मैदानात पाय ठेवताच स्मृती मंधानाच्या नावावर ऐतिहासिक नोंद झाली आहे. तिने एका खास यादीत नाव मिळवलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा कसोटी सामना हा स्मृती मंधानाच्या कारकिर्दीतील 300वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यासह भारताकडून 300 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारी  तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
एप्रिल 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणारी स्मृती मंधाना मागच्या एक दशकापासून भारतीय संघाच्या फलंदाजीचा आधार आहे. या दरम्यान स्मृतीने 120 वनडे, 171 टी20 सामने खेळले आहेत. तसेच तिचा नववा कसोटी सामना आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
स्मृती मंधानाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत वनडेत 5411 धावा, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4538 धावा केल्या आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 600हून अधिक धावा आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
भारतासाठी महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. तिने 374 सामने खेळले आहेत. तर माजी कर्णधार मिताली राजने 333 सामने खेोळले आहे. आता मंधाना या यादीत आली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Follow Us