
आयपीएल 2025 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंच्या अदलाबदलीची चर्चा सुरु आहे. तसेच रिटेन्शन यादी जाहीर करण्यापूर्वी काही खेळाडूंना रिलीज केलं जाणार आहे. असं असताना आयपीएल इतिहासाची पानं उलटताना पाच खेळाडूंची नावं समोर येतात. या खेळाडूंना फ्रेंचायझींनी कधीच रिलीज केलं नाही. (Photo: BCCI)

रनमशिन्स विराट कोहलीचं नाव या यादीत आघाडीवर आहे. विराट कोहली आतापर्यत झालेल्या सर्व पर्वात आरसीबीचा भाग राहिला आहे. 2008 पासून तो या फ्रेंचायझीसोबत खेळत आहे. आरसीबीने त्याला कधीच रिलीज केलं नाही. विराट कोहली फ्रेंचायझीचा काही वर्षे कर्णधारही होता. (Photo: PTI)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. मुंबई इंडियन्ससोबत 2008 ते 2013 या कालावधीत खेळला. सहा पर्व मुंबई इंडियन्सकडून खेळला. पण फ्रेंचायझीने त्याला कधीच रिलीज केलं नाही. यावेळी मुंबई इंडियन्स नेतृत्वही केलं. निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकरला मेंटॉर केले होतं. (Photo: Instagram/TV9 Hindi File)

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू सुनील नरीन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो. 2012 पासून सुनील नरीन कोलकात नाईट रायडर्सचा भाग आहे. सुनील नरीन सुरुवातीला फिरकी गोलंदाजी करायचा. पण आता आक्रमक फलंदाजी करत संघाला चांगली स्टार्ट करून देतो. (Photo: PTI)

महेंद्रसिंह धोनीचं नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर येते. चेन्नई सुपर किंग्सला पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. 2008 पासून फ्रेंचायझीसोबत आहे. पण कधीच फ्रेंचायझीने त्याला रिलीज केलं नाही. दरम्यान, दोन वर्षे फ्रेंचायझीवर बॅन लागला होता तेव्हा रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळला होता. (फोटो- PTI)

दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न याचं नावही या यादीत आहे. आयपीएल स्पर्धेत पहिलं जेतेपद त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने मिळवलं होतं. 2008 ते 2011 या कालावधीत राजस्थानकडून खेळला. पण फ्रेंचायझीने त्याला कधीच रिलीज केलं नाही. (फोटो- TV9 Hindi File)