
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका न्यूझीलंडने 2-1 ने जिंकली. न्यूझीलंडने टीम इंडियाला भारत 37 वर्षानंतर पराभवाची धूळ चारली. मागच्या दौऱ्यात कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव केला होता. त्यामुळे भारताला न्यूझीलंडने आणखी एक जखम दिली. (Photo- BCCI Twitter)

मालिकेची सुरुवात भारताने विजयाने केली होती. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. पण त्यानंतरच्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. विश्वासाच्या खेळाडूंनी केलेल्या सुमार कामगिरीचा फटका टीम इंडियाला बसला. त्यामुळे तीन खेळाडूंचा वनडे संघातील मार्ग बंद होण्याचा स्थिती आहे. (Photo- BCCI Twitter)

अष्टपैलू रवींद्र जडेजाने वनडे मालिकेत सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. फलंदाजी आणि गोलंदाजीतही योगदान देऊ शकला नाही. त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर धावाही करू शकला नाही. मागच्या 10 वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने फक्त 106 धावा केल्या. तसेच 10 विकेट मिळाल्या. (Photo- PTI)

वॉशिंग्टन सुंदरच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली गेली. पण नितीशने अपेक्षाभंग केला. तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतक ठोकलं. पण पुढच्या मालिकेपर्यंत हार्दिक पांड्या फिट अँड फाईन होईल. त्यामुळे नितीशला संधी मिळणं कठीण आहे. (Photo- PTI)

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वारंवार संधी दिल्या जात आहेत. पण त्याच्या गोलंदाजीला काही धार चढताना दिसत नाही. त्यालाही संघातून वगळलं जाऊ शकतं. पहिल्या दोन सामन्याच सुमार कामगिरी केल्याने तिसऱ्या सामन्यात त्याला घेतलं नाही. त्याने फक्त तीन विकेट घेतल्या आणि खूप धावा दिल्या. (Photo- PTI)