
महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अपयशी कर्णधारांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सला 91 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.

विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचं नेतृत्व करताना विराट कोहली याला 70 सामन्यात अपयश आलं आहे.

रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा ट्रॉफी जिंकून दिलीय. रोहित शर्मा आयपीएलमध्ये तिसरा अपयशी कॅप्टन आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईला 67 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.

गौतम गंभीर याने केकेआरला 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल चॅम्पियन केलं. मात्र गंभीर कॅप्टन म्हणून 47 सामन्यात अपयशी ठरला.

डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या स्थानी आहे. डेव्हीड वॉर्नर याला कॅप्टन म्हणून 41 सामने गमवावे लागले आहेत.