
दिल्ली कॅपिट्ल्सचा विद्यमान कर्णधार ऋषभ पंत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पंतने वयाच्या 20 वर्ष 218 व्या दिवशी शतक केलं. पंतने 2018 साली हे शतक ठोकलेलं.

देवदत्त पडीक्कल तिसऱ्या क्रमांकावर आहे. देवदत्तने आयपीएल 2021 मध्ये ही कामगिरी केली होती. देवदत्तने 20 वर्ष 289 व्या दिवशी हे शतक ठोकलं.

मुंबईकर यशस्वी जयस्वाल या यादीत चौथ्या स्थानी आहे. यशस्वीने आयपीएलच्या 16 व्या हंगामात 2023 साली वयाच्या 21 वर्ष 123 व्या दिवशी शतक झळकावलं होतं.

राजस्थान रॉयल्सचा विद्यमान कर्णधार संजू सॅमसन याने 2017 साली शतक केलं होतं. संजू तेव्हा 22 वर्ष 151 दिवसांचा होता. संजू कमी वयात शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा कीर्तीमान हा मनीष पांडे याने केला होता. मनीषने 2009 साली आरसीबीकडून खेळताना वयाच्या 19 वर्ष 253 व्या दिवशी ही कामगिरी केली होती.