
ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. सामनावीराचा पुरस्कार जिंकून कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. (Photo- PTI)

केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ट्रेव्हिस हेडने वेस्ट इंडिजच्या विजयाचं स्वप्न धूसर केलं. यासाठी ट्रेव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सामन्याच्या पहिल्या डावात हेडने 59 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 61 धावा केल्या. (Photo- PTI)

ट्रेव्हिस हेडने दोन अर्धशतकांसह ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील ट्रेव्हिस हेडचा हा दहावा सामनावीराचा पुरस्कार आहे. (Photo-Gareth Copley/Getty Images)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार जिंकत ट्रेव्हिस हेडने हा विश्वविक्रम रचला आहे. कारण हेड व्यतिरिक्त इतके सारे सामनावीराचे पुरस्कार मिळणारा एकही खेळाडू नाही. ट्रेव्हिस हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळलेल्या 50 सामन्यांमध्ये 10 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. (PC: AFP)

बेन स्टोक्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत पाच वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकले आहेत. (फोटो- PTI)

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला. खरं तर पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडे 10 धावांची आघाडी होती. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 310 धावा केल्या. तसेच विजयासाठी 301 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण वेस्ट इंडिजचा संघ फक्त 141 धावांवरच बाद झाला. (Photo: PTI)