WPL स्पर्धेत चांगल्या कामगिरीचं मिळालं फळ, थेट टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून होणार पदार्पण
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जून महिन्यापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात एक नाव वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चला जाणून घेऊयात नंदिनी शर्माची संघात निवड का आणि कशासाठी झाली.

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा जिंकल्यानंतर टीम इंडिया टी20 वर्ल्डकप विजयासाठी सज्ज झाली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृ्त्वात भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात बहुतांश खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले आहेत. पण एक नाव आश्चर्याचा धक्का देणारं आहे. (Photo: nandnisharma Instagram)

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान गोलंदाज नंदिनी शर्माची निवड केली आहे. नंदिनी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे तिची निवड झाल्याने आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. पण ही निवड वुमन्स प्रीमियर स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर झाली आहे. (Photo: nandnisharma Instagram)

चंदीगडकडून खेळणाऱ्या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाज नंदानीची निवड देशांतर्गत क्रिकेट आणि महिला प्रीमियर लीगमधील तिच्या दमदार कामगिरीमुळे करण्यात आली. नंदानीने 2026 च्या WPL हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना पहिल्यांदा आपली छाप पाडली. तिने एकाच सामन्यात हॅटट्रिक आणि पाच बळी घेऊन इतिहास रचला. (Photo: nandnisharma Instagram)

नंदिनीने वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 10 सामन्यांमध्ये 17 बळी घेतले. यासह सोफी डिव्हाईनसोबत हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. डब्ल्यूपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी होती. (Photo: nandnisharma Instagram)

विश्वचषकादरम्यान नंदिनीला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, विश्वचषकाच्या आधी भारतीय संघ इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार असून, या मालिकेतच तिचे पदार्पण होऊ शकते. (Photo: nandnisharma Instagram)