Henil Patel : टीम इंडियाला मिळाला आणखी एक ‘बुमराह’, अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत रचला इतिहास

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. तसेच प्रथम गोलंदाजी स्वीकारत अमेरिकेची दाणादाण उडवून दिली. हेनिल पटेलने निम्मा संघ गारद करत विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Jan 15, 2026 | 4:42 PM
1 / 5
भारतीय वेगवान गोलंदाज हेनिल पटेलने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याच्या पहिल्याच सामन्यात प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवून दिली. उजव्या हाताच्या या मध्यमगती गोलंदाजाने अमेरिकेच्या संघाला फक्त 107 धावांवर बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
हेनिल पटेलने त्याच्या पहिल्याच सामन्यात फक्त 16  धावांत 5 बळी घेतले. हेनिल पटेल फक्त 18 वर्षांचा आहे आणि त्याच्या पहिल्याच अंडर 19 वर्ल्डकप सामन्यात चमकदार कामगिरी केली. हेनिल पटेलकडे दोन्ही बाजूने स्विंग करण्याची हातोटी आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारतीय संघाचा स्विंग स्टार हेनिल पटेलने अमेरिकेच्या टॉप ऑर्डर फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. हेनिलने त्याच्या पहिल्याच स्पेलमध्ये 14 धावांत तीन विकेट काढल्या.सात विकेट गेल्यानंतर कर्णधार आयुष महात्रेने चेंडू त्याच्याकडे पुन्हा चेंडू सोपवला. त्यानंतर त्याने एकाच षटकात दोन विकेट घेतल्या. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हेनिल पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. कमल पासीने 2012 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 23 धावांत 6 बळी, 2018 मध्ये अनुकुल रॉयने पीएनजीविरुद्ध 14 धावांत 5 बळी घेतले होते. आता आठ वर्षांनंतर हेनिल पटेलने अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघासाठी पाच बळी घेतले आहेत.(Photo- Instagram)

5 / 5
हेनिल पटेल हा गुजरातचा क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म 28 फेब्रुवारी 2007 रोजी गुजरातमधील वलसाड येथे झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळणारा हेनिल हा एक प्रभावी वेगवान गोलंदाज आहे. त्याने फलंदाजीतही आपली चमक दाखवली आहे. (Photo- Instagram)