Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात मोडले तीन विक्रम
India vs England 2nd T20I: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. मँचेस्टर येथे दुसऱ्या टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने या सामन्यात 10 चेंडूत 14 धावा केल्या. पण तीन विश्वविक्रम मोडले.

वैभव सूर्यवंशीला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आक्रमक बाणा दाखवला. पण 14 धावांवरच त्याचा खेळ आटोपला. पण या डावात त्याने दोन उत्तुंग षटकार मारले. विल जॅक्सनच्या गोलंदाजीवर सूर्यवंशी यष्टीचीत झाला पण तिथपर्यंत त्याने तीन विक्रम आपल्या नावावर केले होते. (PC-GETTY IMAGES)

वैभव सूर्यवशी पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. 15 वर्षे आणि 99 दिवसांचा असताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला षटकार मारला. यापूर्वी बांगलादेशच्या मुहम्मद शरीफच्या नावावर हा विक्रम होता. त्याने 15 वर्षे आणि 260 दिवसांचा असताना षटकार मारला होता. हा षटकात पाकिस्तानविरुद्ध कसोटीत 2001 मध्ये मारला होता. (PC-GETTY IMAGES)

वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम राशिद खानच्या नावावर होता. त्याने 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 17 वर्षे 110 दिवसांचा असताना षटकार मारला होता. (PC-GETTY IMAGES)

वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या चेंडूवर षटकार मारला. हा षटकार जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मारला. त्यानंतर सातव्या चेंडूवर जोश टंगला षटकार मारला. तिसरा षटकार मारणाच्या नादात विल जॅक्स गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. (PC-GETTY IMAGES)

वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने 16 वर्षे आणि 205 दिवसांचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. (PC-GETTY IMAGES)