
वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापासून क्रिकेटच्या इतिहासात नवं पानं लिहिण्यास सुरुवात केली आहे. मू्र्ती लहान पण किर्ती महान असंच म्हणावं लागेल. वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच टीम इंडियाच्या जर्सीत अंडर 19 क्रिकेटच्या वरचा खेळ खेळत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने शतकी खेळी करत इतिहास रचून दाखवला आहे. (Photo: PTI)

वैभव सूर्यवंशीची वरिष्ठ पातळीवरील टीम इंडियात निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात त्याने 32 चेंडूत शतक ठोकलं. पहिल्यांदाच भारताकडून टी20 क्रिकेट खेळणाऱ्या वैभवने युएईविरुद्ध विक्रमी शतक ठोकलं. तसेच इतिहास रचला. (Photo: Asian Cricket Council)

वैभव सूर्यवंशी 14 वर्षे आणि 232 दिवसांचा असून त्याने जगातील कोणत्याही देशाच्या रिप्रेंजेटेटिव्ह टीम (वरिष्ठ राष्ट्रीय संघ आणि 19 वर्षांखालील संघ वगळता) शतक ठोकणारा युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 324.85 च्या स्ट्राईक रेटने मेन्स टी20 क्रिकेटमध्ये चौथी वेगवान शतकी खेळी केली आहे. (Photo: Asian Cricket Council)

ख्रिस गेल, रोहित शर्मा, शाहिद आफ्रिदी यासारखे आक्रमक खेळणारे खेळाडू जे करू शकले नाहीत, ती कामगिरी वैभव सूर्यवंशीने केली आहे. वैभव सूर्यवंशी 35 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोन टी20 शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. (Photo: PTI)

वैभव सूर्यवंशीने या सामन्यात 42 चेंडूत 144 धावा केल्या. खरं तर त्याची खेळी पाहून द्विशतक ठोकतो की काय असं वाटत होतं. कारण त्याच्याकडे खेळण्यासाठी बरेच चेंडू शिल्लक होते. पण बाद झाला. वैभवने 324.85 च्या स्ट्राईक रेटने 15 षटकार आणि 11 चौकार मारले. (Photo: Getty Images)