
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रेंचायसीने 16 वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 8 गडी राखून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या विजयासाठी आरसीबी फ्रेंचायसीचं 16 वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं.

विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी मालक विजय मल्ल्या याने संघांचं अभिनंदन केलं. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पुरुष संघ आयपीएल जिंकल्यास आनंद द्विगुणित होईल असंही विजय मल्ल्याने आपल्या ट्वीटमध्ये दिलं आहे.

विजय मल्ल्या आरसीबी संघाचा संस्थापक आहे. 2008 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात त्याने आरसीबी संघ 455 कोटी रुपयांना घेतला होता. लिलावात आरसीबी संघासाठी सर्वाधिक बोली लावली होती.

2016 मध्ये कर्जबाजारी झाल्यानंतर बँकांचे पैसे बुडवून विजय माल्ल्या इंग्लंडला पळून गेला आहे. आता तो आरसीबीचा मालक नाही. विजय मल्ल्याने 17 बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवले असून पळून गेला आहे. आता तो लंडनमध्ये राहात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आयपीएलमध्ये पहिला सामना 22 मार्चला होणार आहे. धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सशी लढत होणार आहे. त्यामुळे या पर्वाची सुरुवात विराट कोहलीचा सघ कसा करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

आरसीबी संघ : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, सौरव चौहान, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, आकाश दीप, मनोज भांडगे, टॉम करन, कॅमरून ग्रीन, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, सुयष प्रभुदेसाई, मयंक डागर, लॉकी फर्ग्युसन, अल्जारी जोसेफ, मोहम्मद सिराज, राजन कुमार, हिमांशु शर्मा, करण शर्मा, स्वापनिल सिंह, रीस टॉप्ले, विजय कुमार, यश दयाल.